नगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आता कमी होऊ लागलेला आहे. परंतु सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 240 बाधितांच्या आकड्याने वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात एकूण 912 नवीन बाधित आढळून आले होते. आज मंगळवारी 1152 जण बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 375, खासगी तपासणीत 428 व रँपिड तपासणीत 349 बाधित आढळून आलेले आहेत.
यामध्ये महापालिका हद्दीतही 36 नवीन बाधितांची भर पडली आहे. हा शहरवासीयांना दिलासादायक आकडा आहे. संगमनेर तालुक्यात रुग्ण आढळून आलेले आहेत. संगमनेरमध्ये 153 जण आढळून आलेले आहेत.
नेवासा तालुक्यात दुसर्या क्रमांकाची आकडेवारी आढळून आली आहे. नेवाशातमध्ये 137 रुग्ण आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात तिसर्या क्रमांकाची रुग्ण संख्या आढळून आली आहे. श्रीगोंद्यामध्ये 118 रुग्ण आढळले आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यात 1408, शनिवारी 1588, रविवारी 1440, सोमवारी 912, मंगळवारी 1152 रुग्ण आढळून आलेले आहेत.
Post a Comment