बाधितांच्या आकड्यात पारनेर पुन्हा नंबर वन.. श्रीगोंदा व अकोलेत चिंता कायमच...


नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. रविवारी बाधितांचा आकडा वाढ झालेला होता. आज (सोमवारी) बाधितांचा आकडा कमी झालोला आहे. 

जिल्ह्यात आज सोमवारी 235 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात पात, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात दहा,  तर अँटीजेन चाचणीत 160 असे एकूण 235 कोरोना बाधित आढळून आले. 

पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 35 जण बाधित आढळून आलेले आहेत. पारनेर तालुक्याने गेल्या तीन दिवसांपासून बाधितांच्या आकड्यात घेतलेली आघाडी घेतलेली असून ती कायम आहे. 

श्रीगोंदा तालुका दुसर्यास्थानी आला आहे. पारनेरमध्ये आज 30 बाधित आढळून आलेले आहेत.  अकोलेमध्ये 24 जण बाधित सापडलेले आहेत. 

नगर शहरात रविवारी 18 जण बाधित आढळले होते. आज फक्त तीन जण बाधित आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत जिल्ह्यात बाधितांचा आकडा 187 ने घटला आहे.  

बाधितांचा आकडा कमी जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तिसर्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आज आघाडी घेत पहिला नंबर मिळविला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post