देहू, आळंदीमध्ये संचारबंदी आदेश...

आळंदी : आषाढी वारी सोहळा येत्या एक जुलैला जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने सुरू होत आहे. पण यंदा ही कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे.  संभाव्य गर्दीमुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायकडून देहू व आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आषाढी एकादी निमित्ताने दरवर्षी दिंडी पंढरपूरकडे जात असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.  त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी 28 जून ते 4 जुलैपर्यंत देहू व आसपासच्या 6 गावांमध्ये संचारबंदी लागू केली. 

स्थानिक देहूकरांना ओळखपत्र दाखवूनच गावात प्रवेश देण्यात येणार आहे. देहूरस्ता पोलिसांकडून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. 

बॅरिकेट्स लावून पोलिसांनी मंदिर परिसर बंद केला आहे, त्यामुळे संपूर्ण देहूनगरीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कोरोनाच्या वाढता प्रसार पाहता गर्दी टाळण्यासाठी जमेल तितके कठोर निर्बंध स्थानिक प्रशासनाकडून लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 


सरकारने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन केले जावे याची स्थानिक पातळीवर देखील खबरदारी घेतली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा व डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post