ग्रामीण पञकार संघाच्या कार्याध्यक्ष राजेंद्र आढाव


आरडगाव : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या राहुरी तालुका  कार्याध्यक्ष पदी राजेंद्र आढाव यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापिठातील धर्माडी गेस्ट हाऊसवर अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुका  कार्यकरणीची  नुकतीच बैठक संपन्न झाली. यामध्ये  नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी होते तर निवड झालेल्या पत्रकारांना ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, सचिव अनिल कोळसे,यांच्या सह मान्यवरच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये राहुरी तालुध्याक्ष पदी गोविंद फुणगे यांची तर कार्याध्यक्ष पदी राजेंद्र आढाव यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्रीकांत जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष पदी संतोष जाधव, जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी लक्ष्मण पटारे,शहर अध्यक्ष पदी शरद पाचारने,  उपाध्यक्ष पदी बाळासाहेब कांबळे, तालुका  तालुका सचिवपदी आकाश येवले, संघटकपदी संदिप पाळंदे ,तालुका सरचिटणीसपदि कमलेश विधाटे,खजिनदार जावेद शेख,समन्वयक रूषी राऊत,सह सरचिटणीस पदी सचिन पवार व जिल्हा कार्यकरणी रमेश जाधव यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post