पाथर्डी : देशात २१ महिने आणीबाणी असलेल्या काळ्या दिवसाच्या कटू आठवणीची आजच्या पिढीला माहिती व्हावी तसेच त्या काळात संघर्ष व विरोध करून आणीबाणीत तुरूंगवास भोगलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याचा सन्मान करणे हा भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चच्या वतीने राज्यात २५ जून आणीबाणी दिवस साजरा केला जात आहे. पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चातर्फे तालुक्यातील आणीबाणी काळात तुरूंगवास भोगलेल्या सिताराम बाहेती यांचा व स्व. विजयकुमार छाजेड यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव बाळासाहेब छाजेड यांचा आमदार राजळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सभापती गोकुळ दौंड, शहराध्यक्ष अजय भंडारी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, राहुल कारखेले, पं.स.सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण, नगरसेवक अनिल बोरूडे, रमेश हंडाळ, नामदेव लबडे, मंगल कोकाटे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशिबाई गोल्हार, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पालवे, तालुका सरचिटणीस आदिनाथ धायतडक, जमीर आतार, अशोक मंत्री, बाळासाहेब गोल्हार,महेश अंगारखे, हर्षद गर्जे, बाळासाहेब शिरसाठ यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले यांनी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला.
राजळे म्हणाल्या की, राजकीय परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तत्कालीन काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करून व्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावून आणीबाणीला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुगांत डांबले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी तर सरचिटणीस जे. बी. वांढेकर यांनी प्रास्ताविक केले. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी आभार मानले.
Post a Comment