राहुरी : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून तसेच तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी एका विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण घेत असताना नेवासा तालुक्यातील तरूणीची राहुरी येथील मोमीन आखाडा परिसरात राहणारा संदिप सुभाष माळी या तरूणाबरोबर ओळख झाली. दोघांमध्ये घनिष्ठ ओळख होऊन चॅटिंग चालू झाले. त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या.
संदिप सुभाष माळी या तरूणाने त्या तरूणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून दि.10 मार्च 2019 रोजी पहिल्यांदा शारिरीक अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने हे कृत्य केले.
त्या नंतर दुसर्याच तरूणीबरोबर लग्न केले. त्यामुळे नेवासा येथील पीडीत तरूणीने राहुरी पोलिसात त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तो तरूण पसार झाला आहे. राहुरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Post a Comment