कांद्याच्या भावात वाढ...


राहाता : येथील बाजार समितीत मंगळवारी  कांद्याची 14 हजार 207 गोण्यांची आवक झाली. सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात वाढ झाली.

राहाता बाजार समितीत 14 हजार 207 कांदा गोण्यांची आवक झाली. मंगळवारी एक नंबर कांद्याला 2400 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला. 

सोमवारच्या तुलनेत कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. सोमवारी एक नंबर कांद्याला 2200 रुपयांचा भाव मिळाला होता. मंगळवारी कांद्याच्या भावात वाढ होऊन कांद्या 2400 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला.

सोमवारचे कांद्याचे प्रतवारीनुसार बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये : एक नंबर कांद्याला 1600  ते 2200, दोन नंबर कांद्याला 1050 ते 1550,  तीन नंबर कांद्याला 500 ते  1000, गोल्टी कांद्याला 1300 ते 1600, जोड कांद्याला 100  ते 500.

मंंगळवारचे कांद्याचे भाव प्रति क्विंटलमध्ये एक नंबर कांदा : 180 ते 2400, दोन नंबर कांदा : 1250 ते 1750, तीन नंबर कांदा :500 ते 1200, गोल्टी कांदा : 1300 ते 1600, जोड कांदा : 100 ते 500

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

राहाता बाजार समितीत डाळिंबाची 16 हजार 510 क्रेटसची आवक झाली. यामध्ये डाळिंबाला सर्वाधिक 125 रुपये किलोचा भाव मिळाला.

बाजार समितीचे किलोमध्ये डाळिंबाचे भाव : एक नंबर डाळिंब : 91 ते 125, दोन नंबर डाळिंब : 61 ते 90, तीन नंबर डाळिंब : 31 ते 60, चार नंबर डाळिंब : अडीच रुपये ते 30 रुपये किलो दराने विक्री झाली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post