जीवनातील प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देत जीवनात वाटचाल केली. कोणत्या संकटात त्यांनी माघार घेतली नाही. त्यातून मार्ग काढत त्यांनी जीवन यशस्वी केले आहे. स्वता:चे आनंदी जीवन जगून त्यांनी आम्हा भावडांनाही जीवनातील सुख-दु:खात जीवनात कसा मार्ग काढायचा याची शिदोरीच त्यांनी संस्कारातून दिली आहे. त्यामुळे मी व माझे दोन भाऊ जीवनातील प्रत्येक ठिकणी यशस्वी झालेलो आहोत. हे सर्व शक्य झाले ते आमच्या आबांच्या संस्काराच्या शिदोरीनेच झाले आहे. ही संस्काराची शिदोरी आम्ही पुढेही तशीच नेणार आहोत.
- मनिषा वासकर बिडवे
वडिलांविषयी सर्वच मुलांना सदैव अभिमान असतो. मुलांपेक्षा मुलींना वडिलांविषयी जास्त अभिमान वाटत असतो. आईपेक्षा आम्हाला वडिलांविषयी जास्त प्रेम केले आहे.
कष्टमय जीवनातूनच आमच्या आबांनी संसाराचा गाडा हाकला. येणार्या प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देत. त्यांनी जीवनाची वाटचाल सुरु ठेवली. संकटाच्या वेळीही नातेवाईक व मित्र परिवाराला सदैव त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारात नेहमीच भर पडत गेली. नातेवाईकही कधी दुरावलेले नाहीत. सुरवातीपासूनचे नाते घट्ट बनत गेलेली आहेत.
दोन्ही भावासह मला शिकवलं. मुलगा व मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही. मुलांप्रमाणेच आबांनी मला संस्काराचे धडे दिले. आबांनी लहानपणापासून केलेल्या संस्काराचा आज जीवनात प्रत्येक प्रसंग व घटनांच्या वेळी कामी येत आहे. त्यांच्या संस्काराची तिजोरी आम्ही तीनही बहिण भावांनी पुढे नेण्याचा निर्धार करून मुलांनाही त्यानुसार घडवत आहोत.
वडील म्हटलं की जितका जिव्हाळा असतो तितकीच भीतीही वाटते. ही अर्थातच आदरयुक्त भीती असते. पण आता वडील आणि मुलीचं अथवा मुलाचं नातं बदलताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आईप्रमाणेच वडील आपल्या मुलांचे मित्र म्हणून वागतात.
आमचे आबाही आमच्याशी नेहमीच मैत्रीच्या नात्यातून बोलत असतात. मात्र त्यांची शिस्त कायम होती. त्यांच्या विषयी आजही आम्हाला आदरयुक्त भीती आहे. ती सदैव राहणार आहे. कारण वडिलांच्या बोलण्यात जशी माया दिसते. तसेच आवाजात दराराही असून तीच भीती कायम आहे.
कष्टमय जीवन जगू त्यांनी आज जे वैभव निर्माण केलेले आहे. त्या वैभवात माझे भाऊ आणि मी भर घालत असून त्यांची सर्वांविषयी असलेला आदरभाव, जिव्हाळा, मदत करण्याची धडपड व संस्काराची शिदोरी पुढे नेत आहोत.
तसा आमचा मोठा जथ्था आहे. आमचे आबा आणि त्यांचे दोन भावंड व असे सर्वजण एक दिलाने राहतो. एकमेकांकडे असलेल्या सुख-दुु:खात आम्ही सहभागी असतो. मी नशिबवान समजते मला सात भावंड असून त्यांत्याकडूनही वडिलांप्रमाणेच प्रेम मिळते. पण वडिलांची माया निराळीच असते.

Post a Comment