नगर शहरासह ग्रामीण भागाला दिलासा...


नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी झाला आहे. तीन महिन्यातील सर्वात कमी आकजा आज आलेला आहे. बाधितांची संख्या कमी होऊ लागली असली तरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागाला बाधितांच्या आकड्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आज शुक्रवारी फक्त 309 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 14, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 180,  तर अँटीजेन चाचणीत 115 असे एकूण 309 कोरोना बाधित आढळून आले. 

शेवगावने जिल्ह्यात आघाडी घेतली. शेवगावमध्ये 38 जण बाधित आढळून आलेले आहेत. पारनेरमध्ये 37, जामखेडमध्ये 30 तर नगर शहरात अवघे पाच बाधित आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post