नगर : काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेना, भाजप नंतर आता मनसे मधून काँग्रेसमध्ये इन्कमिंग झाले आहे. मनसे उपशहर प्रमुख ऋतिक लद्दे व त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
आमदार लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी लद्दे व समर्थकांचे काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केले.
जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. ऋतिक लद्दे हे सावेडी उपनगरातील युवा नेतृत्व आहे. ते मनसेचे उपशहर प्रमुख होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे.
यावेळी ऋतिक लद्दे यांच्यासह अक्षय बरकासे, सौरव सोनार, शुभम आव्हाड, नईमुदिन शेख, वैभव तिजारे, आनंद शिंदे, किरण नेटके, सुयोग अडगल, अनाता पालवे, समीर अत्तार, अविनाश जाधव, सोहेल शेख, विजू थोंबे, सौरभ कांबळे, शफीक शेख, धनंजय गायकवाड आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Post a Comment