राहुरी ः स्व.शिवाजीराजे गाडे यांचे कार्य,सर्वसामान्य माणसाविषयी त्यांचा असणारा जिव्हाळा, संकट समयी एखाद्या व्यक्तीला त्यांची मदत करण्याची धडपड राहुरी तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारे सर्वश्रुत आहे. किंबहुना आजही लोकांच्या मनात राजेंची तथा त्यांच्या कामाची आठवण कायम आहे. आज राजेंच्या आठवणीला उजाळा आज त्यांचा मुलगा जिल्हापरिषद सदस्य धनराज गाडे यांच्यामुळे राहुरीकरांना मिळाला.
संध्याकाळी साडे
सहाच्या दरम्यान कृषी विद्यापीठाच्या सिमेन केंद्राजवळ नगर मनमाड रस्त्यावर
एक तरुण दुचाकी वरून घसरून खाली पडलेला होता. कोणी दुचाकीचा तर कोणी तरुणाचा मोबाईलमध्ये छायाचित्र काढण्याचे काम करीत
असतानाच धनराज गाडे नगरहून घरी परतत असताना ते दृश्य पाहून थांबले.ताबडतोब
रुग्ण वाहिकेला फोन केला. अपघातग्रस्त तरुणाच्या खिशातील आधार कार्ड वरून
वडगाव गुप्ता येथील आपल्या परिचीत व्यक्ती मार्फत त्या तरुणाच्या
कुटुंबियांना माहिती दिली. त्या तरुणाला नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
घाबरू नका, तो ठीक आहे. हे सर्व करत असतानाच त्या
तरुणाला दिलासा देत घाबरू नको म्हणणाऱ्या धनराज गाडेंना पाहून आज राजेंची
आठवण उपस्थितांना आली. अपघातग्रस्त तरुणांच्या पोटावरुन फिरणारे हात राजेंची आहेत,
असा भास अनेकांना यावेळी होत होता. राजे तुम्ही आजही आमच्यात आहात असेच सर्वांना वाटत होते.
शिवाजीराजे यांचे कार्याचा वारसा आता धनराज गाडे चालवित आहे.वडिलांच्या मदत कार्याचा वारसा सुरू ठेवणाऱ्या धनराज गाडे यांचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment