राहुरी : बिबट्याला वनविभागाने वेळेत उपचार व अन्नपाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरात महेश वाघमारे व भाऊसाहेब धामोरे यांच्या शेतात शेजारी बिबट्या आजारी आवस्तेत आढळून आल्यानंतर येथील माजी सरपंच शरद पानसंबळ व ग्रामस्थांनी विनविभागाचे भगवान परदेशी संपर्क केला असता बिबट्या आजारी आहे.
त्याला उपचाराची गरज असल्याने लवकरात लवकर त्याच्यावर उपचार सुरू करा नाही तर त्याचा मृत्यू होईल, असे ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्यांना सांगितले.
त्यावर वन अधिकार्यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. वन विभागाच्या
हलगर्जीपणामुळे बिबट्याला प्राणी गमवावे लागले आहे, असा आरोप केला आहे. वनविभागाशी संपर्क केला आसात नरजातीच बिबट्या चिंचविहिरे परिसरात येथील माजी सरपंच शरद पानसंबळ यांच्या माहितीवरुन प्रत्यक्ष पाहणी साठी गेलो आसता त्यांच्या जवळ जाताच बिबट्याने आमच्यावर डरकाळी फोडली.
बिबट्याला वेळेच उपचार व अन्नपाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
Post a Comment