पाथर्डी : कोरोना सह विविध साथ रोगाचा ग्रामीण भागात वाढता धोका लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी विकास कामांसाठी लाभदायी ठरणार आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण आरोग्यासाठी निधीचा वापर प्राधान्याने करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले
तालुक्यातील मढी येथे माळी बाभुळगाव गणाच्या पंचायत समिती सदस्या मनीषा वाईकर यांच्या विकास निधीसह वित्त आयोगाच्या निधीतून गणातील अकरा ग्रामपंचायतींना ओला व सुका कचरा टाकण्यासाठीच्या डस्टबिन व हायमॅक्स दिव्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रमास केवळ निमंत्रितांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून पुरूषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, उपसभापती मनीषा वायकर, माजी सरपंच भगवान मरकड, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, सचिव विमल मरकड, उपसरपंच रवींद्र अरोळे, ग्रामपंचायत सदस्य पोपट घोरपडे, चंद्रभान पाखरे, जनार्धन मरकड, माजी देविदास मरकड, घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यपूर्ण भारत असा संदेश देत गावपातळीपासून सार्वजनिक स्वच्छतेवर भर देत लोकसहभाग वाढविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली.
रस्ते पाणी वीज या विकासाबरोबरच आरोग्य सबंधी जाणीव जागृती करत गावाचे आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे.
याची प्रचिती कोरोना साथ रोगामुळे आली गाव पातळीवरील गट-तट पक्षभेद विसरून गावाच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र आले. तर प्रत्येकाचे आरोग्य जपले जाईल माणूस वाचला तर पुढचे सर्व होत राहील.
याचा विचार सर्वांनी करावा माळी बाबळगाव गणातील सदस्य मनीषा वायकर यांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून गणातील सर्वच ग्रामपंचायतींना कचरा साठवण्याची साधने उपलब्ध करून देत आरोग्य जागृती साधण्याचा प्रयत्न केला.
भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी गावाचा लौकिक देशभर आहे नाथ संप्रदायाची शिकवण या निमित्ताने सर्वदूर पोहोचून तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रम मढी येथे होत आहे. तालुक्यातील सर्वच पंचायतींनी आरोग्याच्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू.
कार्यक्रमाचे ज्येष्ठ नेते नवनाथ मरकड यांनी प्रास्ताविक केले. राजू सुरूवसे व दशरथ मरकड यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संजय मरकड यांनी आभार मानले.
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी काहीनी मोर्चेबांधणी करून चर्चा घडवून आणली गावातील सर्व गटातटांना मान्य असणारे नेतृत्व भगवान मरकड यांनी आमदारांच्या उपस्थितीत त्यांच्याच समर्थकांना चपराक देत आगामी राजकारणाची चुणूक दाखवली
Post a Comment