राहुरी फॅक्टरी : येथील तनपुरे कारखाना संचलित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे तब्बल २९ महिन्याचे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.
राहुरी फॅक्टरीतील श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे जवळपास 17 कर्मचाऱ्यांचे जानेवारी 2019 ते मार्च 2021 या कालावधीतील 29 पगार थकीत आहेत. संस्थेच्या ऑफिसमधून तुम्ही राजीनामा द्या व करारावर सही करून 70 टक्के प्रमाणे पगार घेऊन जा असे फोन येतात.
गरीब कुटुंबातील सर्व कर्मचारी असल्याने प्रामाणिकपणे 2009 पासुन सेवा केली असताना पूर्ण थकीत पगार देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकेच्या खात्यात पैसे असतानाही आमचे पगार राजीनामा देत नसल्यामुळे अदा करत नाही.
10 जुलै पर्यंत थकीत पगार अदा करून कर्मचाऱ्यांना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतर ठिकाणी सामावून न घेतल्यास 11 जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा संस्थेचे प्रशासकी अधिकारी व प्राचार्य यांना कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी प्रसाद लोखंडे, शशिकांत म्हसे, अशोक सागर, सुनील आढाव, , बाळासाहेब आढाव, ज्ञानेश्वर म्हसे, प्रदीप वराळे, किरण शिंदे, माधव कोकाटे, अण्णासाहेब झाबरे, सोमनाथ वरखडे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment