सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं...


सांगली : रस्ता कामाचे बिलाच्या पोटी चार टक्के रक्कम मागणार्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरपंचाला अटक केली आहे. ही कारवाई ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात आली. या प्रकरणी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी  आटपाडी तालुक्यातील करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचे बिल मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे यांनी बिलाच्या चार टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता सरपंच खंदारे यांनी तक्रारदारांकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post