नगर ः जिल्ह्यात काेराेना मागील दाेन महिने हाहाकार उडवून दिलेला हाेता. बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु झाली हाेती. बेड न मिळाल्याने काहींना आपला जीवही गमावण्याची वेळ आली हाेती. मात्र मागील आठवड्यापासून काेराेना बाधितांचा आकडा कमी कमी हाेत आलेला आहे. आत नऊशेच्या आत ही संख्या आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात 858 जण बाधित आढळून आलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 188, खासगी तपासणीत 308, रॅपिड तपासणीत 362 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पाथर्डी तालुक्यात आढळून आलेले आहेत. पाथर्डीत 132 रुग्ण आढळून आलेले आहेत.महापालिका हद्दीत आज बाधितांचा आकडा वाढलेला असून दिवसभरात 54 बाधित आढळलेले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
पाथर्डी ः 132, कर्जत ः 78, नगर ग्रामीण ः 61, श्रीगाेंदे ः 60, नेवासे ः 59, संगमनेर ः 59, श्रीरामपूर ः 57. नगर शहर ः 54, राहुरी ः 49, पारनेर ः 47, काेपरगाव ः 39, अकाेले ः 35, राहाता ः 35, शेवगाव ः 33, जामखेड 27, इतर जिल्हा ः 21, भिंगार ः आठ, मिल्ट्री हाॅस्पिटल ः चार.
Post a Comment