​राहात्यात कांद्याला आज मिळाला इतका भाव...


​राहाता ः येथील बाजार समितीत नऊ हजार 606 गाेण्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याला दाेन हजाराच्या पुढे भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये अानंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध उठविण्यास सुरवात केलेली आहे. त्यानुसार आज कांद्याचे लिलाव करण्यात आले. राहाता बाजार समितीत कांद्याच्या नऊ हजार 606 गाेण्यांची आवक झाली हाेती. कांद्याला आज भावही चांगला मिळाला. आगामी काळातही असाच भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे. 

कांद्याचे भाव प्रतिक्विंटलमध्ये
एक नंबर कांद्याला 1600 ते 2200, दाेन नंबर कांद्याला ः 1050 ते 1550, तीन नंबर कांद्याला 400 ते एक हजार, गाेल्टी कांद्याला ः 1200 ते 1500 व जाेड कांद्याला 20 ते 400 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post