ज्ञानगंगा उपक्रमात भारनियमनाची आडकाठी...


नगर :
कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुपरू आहेत.  अशा परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा निर्णय झालेला नाही. या काळात विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी सोमवार  (ता. 14 ) पासून दूरदर्शनच्या डी. डी. सह्याद्रीवरून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज पाच अध्यपान करण्यास सुरवात झालेली आहे. मात्र या अध्यापन प्रक्रियेत भारनियमनाचा अडथळा येत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिका प्रक्षेपित करण्यात येत आहे. या तासिका या पहिली ते बारावीच्यापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.
 
यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शौक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक 5 तास (300 मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जात आहे.  

हे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी साडे सात ते दुपारी साडेतीन या वेळेमध्ये डी .डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता दहावी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता बारावीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु  येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 
 
शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी कोड स्कॅन करून अथवा येथे क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या फ्री डीशवर 525, डिश टिव्हीवर 1229, व्हिडीओकॉन डीटूएचवर 769, टाटा स्कायवर 1274, हेटवे या चॅनेलवर 513 या क्रमांकवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाच्या तासिका दिसत आहेत. 
परंतु भारनियमन तसेच वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात अडथळे येत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post