पाथर्डी ः शहरातील कसबा पेठ येथील बोडखे बाबा दर्गाचे (समाधी) सुशोभीकरण सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असून ते त्वरित बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
याबाबत
नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे यांना उमेश तुपे, मुनीर आतार, अर्षद
पठाण, राहुल शिरसाठ यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की,
कसबा विभागाचे श्रद्धस्थान असलेल्या बोडखे बाबांच्या समाधी परिसरातील
सुशोभीकरण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
आराखड्या प्रमाणे काम होत नसून प्रत्यक्षात वेगळे काम करून निकृष्ठ आणि दर्जाहीन काम संबंधित ठेकेदार करीत आहे. यामुळे विकास कामावर केलेला लाखों रूपयांचा शासकीय निधी पाण्यात जाणार आहे. परिसरातील नागरिकांच्या मागणी व अंदाजपत्रका प्रमाणे हे काम करण्यात यावे.
तो पर्यत हे काम सुरू न करण्याची मागणी केली केली आहे. हे काम बंद न झाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोध आंदोनल करण्याचा इशारा तुपे यांनी दिला आहे.
Post a Comment