पाथर्डी ः सहकार महर्षी स्व. दादापाटील राजळे यांच्या १५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या परिसरात आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद.सदस्य राहुल राजळे, कारखान्याचे
उपाध्यक्ष रामकिसन काकडे, संचालक सुभाष ताठे, सुभाष बुधवंत, अॅड.अनिल
फलके, शेषराव ढाकणे, डॉ. यशवंत गवळी, संस्थेचे सचिव तथा वृध्देश्वर
कारखान्याचे कार्यकारी संचालक जे.आर. पवार, आर. वाय. म्हस्के, वसंतराव भगत आदी
उपस्थित होते.
यावेळी शिक्षण संस्थेचे विश्वस्त उद्धव वाघ यांनी
स्व. दादापाटील राजळे यांच्या कार्याचा गौरव करून आठवणींना उजाळा
दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एस. आर. भराटे, डॉ. साधना म्हस्के, प्रा. रोहित
अदलिंग, प्रा. अरुण भोर, प्रा. असलम शेख यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्रा. राजेंद्र इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी स्वागत केले. प्रा.आसाराम देसाई यांनी आभार मानले.
Post a Comment