राहात्यात कांद्याच्या भावाने घेतली उसळी


राहाता ः
येथील बाजार समितीत सुमारे 12 हजार 214 कांदा गोण्यांची आवक झाली. मंगळवारी कांद्याच्या भावात घसरण झाली होती. मात्र आज कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे.

हे वाचले का ः प्रवेशाेत्सवाचा सेल्फी पाॅईंट ठरल नवागतांचे आकर्षण...

येथील बाजार समितीमध्ये 12 हजार 214 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2400 रुपयांचा भाव मिळाला. कांद्याला मागणी वाढल्याने भावात वाढ झालेली आहे.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव
एक नंबर कांदा ः 1800 ते 2400, दोन नंबर कांदा ः 1250 ते 1750, तीन नंबर कांदा ः 500 ते 1200, गोल्टी कांदा ः 1400 ते 1600, जोड कांदा ः 300 ते 500.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post