राहुरी बाजार समितीकडून निमावली जाहीर...


राहुरी ः काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता प्रशासनाने कांदा लिलावाबराेबरच इतर भुसार मालाचे खरेदी विक्री सुरु करण्यात परवानगी दिलेली आहे. त्यामुळे राहुरी बाजार समितीतर्फे सर्व कांदा उत्पादक शेतकरी बंधू, आडते व्यापारी, खरेदीदार व्यापारी, हमाल, तोलणार, वाहनचालक व मदतनीस बंधुंना नियमावली घालून दिलेली आहे. त्यानुसारच कामकाज करण्याचे सूचित केलेले आहे.

राहुरी मुख्य बाजार आवार येथील कांदा  मोंढा कामकाज सोमवार ते शनिवार या दिवशी सुरू होत आहे. सोमवार, बुधवार  व शुक्रवार या दिवशी कांदा मोंढ्याची आवक सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत बाजार आवारात स्वीकारली जाईल. सकाळी अकरा वाजल्यानंतर कांद्याची आवक स्विकारली जाणार नाही. 
 
मंगळवार, गुरुवार व शनिवार  या दिवशी कांदा मोंढा लिलाव सकाळी आठ ते अकरा या वेळेत होणार आहे. भुसार मोंढा कामकाज सकाळी सात ते अकरा पर्यंत सुरू राहील. कुठल्याही परिस्थीत कांदा मोंढ्याच्या दिवशी आवक स्वीकारली जाणार नाही. बाजार आवरामध्ये येतांना प्रत्येकाने आपल्या नाकाला व तोंडाला मास्क लावणे  तसेच सर्वांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post