म्हसेगावचे उद्याेजक पवार यांची काेविड सेंटरला मदत...


​पारनेर ः म्हसे गावचे उद्याेजक गुलाबशेठ पवार यांनी आपला वाढदिवस श्री मळगंग काेविड सेंटरमध्ये साजरा केला.

वाढदिवसानिमित्ताने हाेणारा खर्च टाळून टाकळी हाजी येथे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटरावजी गावडे यांच्या प्रयत्नाने सुरु असलेल्या श्री  मळगंगा कोविड सेंटर मधील रुग्नासाठी स्वादिष्ट भोजनाची मेजवाणी देण्यात आली. 
हेही वाचले का ः ​​पहिलं प्रेम
यावेळी  बापूसाहेब गावडे, रूलर फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू गावडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती प्रकाशबाप्पू पवार, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, बळीराजा शेतकरी संघटना शिरूर तालुका अध्यक्ष  सोनभाऊ मुसळे, मलठणचे मा अध्यक्ष संदिप गायकवाड, संजय पवार, राजेंद्र गोसावी, मुरलीधर पवार , तुकाराम वाघचौरे , रोहित पवार, रोहन पवार व वैद्यकिय अधिकारी शुभम बारहाते, डॉ गमे, आरोग्य सेविका सुवर्णा थोपटे, शशिकला पानगे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post