कर्जत ः सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेले कार्य भावी पिढीला आदर्श ठरेल, असे प्रतिपादन कर्जत येथील न्यायाधीश ध.ज.पाटील यांनी केले.
हे वाचले का ः आराेग्य करमचारी म्हणतात... आम्हीही माणसचं आहाेत...
येथील सर्व सामाजिक संघटनेतर्फे जागतिक सायकल
दिनानिमित्त
कर्जत ते रेहकुरी अभयारण्य अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी वृक्षारोपण आणि कर्जत येथील न्यायाधीश ध. ज.पाटील यांची बदली
झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी न्यायधीश एम. एम. पळसापुरे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद
जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्यासह
सामाजिक संघटनेचे सर्व स्वच्छता, निसर्ग व सायकलप्रेमी उपस्थित
होते.
पाटील म्हणाले की, सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्जत
शहर आणि परिसरात गेल्या 245 दिवसांपासून स्वच्छता, वृक्षारोपण व पर्यावरण
संवर्धनासाठी हे कार्य सुरू आहे. हे निश्चित एक प्रेरणादायी असून भावी
पिढीला एक वेगळा आदर्श यामूळे मिळेल आणि कर्जतची एक वेगळी ओळख यातून
निर्माण होईल.सध्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
ऑक्सिजनचे
काय महत्त्व आहे, हे आपण कोरोनाच्या काळात पाहिले आहे. वातावरणातील ओझोनचा
स्तर दिवसेंदिवस कमी होत असल्याने चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन
ही काळाची गरज आहे. हे काम आपण सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करत
आहात. ही एक चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. यावेळी मुख्याधिकारी
गोविंद जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल
यांची भाषणे झाली.
Post a Comment