श्रीगोंदा
ः तालुक्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता तहसीलदार प्रदीप पवार यांनी
कोरोना चाचणी वाढविण्यावर भर दिला आहे. अशाच प्रकारे आढळगाव प्राथमिक आरोग्य
केंद्रात चालू असलेल्या कोरोना चाचणी केंद्राला तहसीलदार प्रदीप पवार
यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त तपासणी करण्यासंदर्भात सूचना केल्या.
सध्या श्रीगोंदा तालुक्यातील कोरोनाची
रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे प्रशासन ही खडबडून जागे झाले
आहे. आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळगाव येथील भाजी
विक्रेते व दुकानदार यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार
प्रदीप पवार यांनी या केंद्राला भेट दिली. योग्य ते मार्गदर्शन
केले.त्यामुळे तहसीलदारांनी कोरोना बाबत आवश्यक पाऊले उचलण्यास सुरुवात
केल्याचे दिसून आले.
यावेळी तलाठी महेंद्र
काळे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहूर वाघ, पोलिस कर्मचारी अमोल
भैलुमे, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत शेळके, प्राथमिक आरोग्य केंद्रातील
प्रयोगशाळा तज्ज्ञ पवार, पर्यवेक्षक ढवळे आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार प्रदीप पवार यांनी आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
Post a Comment