​गुप्त घबाड सापडल्याचा जिल्हाभर बोभाटा... पंचनामा करून सरकारच्या तिजोरीत जमा...



श्रीरामपूर ः
गुप्त धनाबाबतच्या कथा ऐकल्या नाहीत, असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. तसेच गुप्त धन घराचे खोदकाम करताना आढळून आलेले आहे. या गुप्त धनाचा बोभाटा मात्र जिल्हाभर झाला आहे.

बेलापूर गावामध्ये एका घराचे खोदकाम सुरु असताना सापडलेल्या धनाच्या हंड्यात सुमारे अकरा किलो चांदीचे चांदीची राणीच्या काळातील जुनी नाणी, शिक्के सापडली आहेत. सरकारी पंचासमक्ष तहसीलदारांनी पंचनामा करुन ताब्यात घेतले. 

बेलापुरात एका जागेत खोदकाम सुरु असताना सदरचा धनाचा हंडा सापडला. तो हंडा घमालकाने ताब्यात घेतला होता. या गुप्तधनाचा बोभाटा संपूर्ण जिल्ह्यात झालेला आहे. 

आपल्याला खोदकाम करताना चांदीची नाणी सापडल्याने जागा मालकाने प्रशासनाला सांगितले. त्यानुसार तहसीलदार, सर्कल, तलाठी तसेच पोलिस आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चांदीचे नाणे असलेला हंडा ताब्यात घेतला. 

यामध्ये अकरा किलो चांदीची एक हजार 46 चांदीचे शिक्के तसेच जुन्या राणीच्या काळातील नाणी, एक रुपयाचे 915 शिक्के तसेच इतर चार आणे व आठआणेचे नाणी आढळून आले आहेत. अशी एकूण अकरा किलो चांदी तहसीलदारांनी सरकारी पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post