नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. सोमवारी बाधितांचा आकडा कमी झाला होता. आज बाधिताच्या आकड्यात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात बाधितांचा आकडा 635 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 45, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 222 तर अँटीजेन चाचणीत 368 असे एकूण 635 कोरोना बाधित आढळून आले.
पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 136 जण बाधित आढळून आलेले आहेत. कर्जत तालुका सध्या जिल्ह्यात दोन नंबरला आहे. कर्जतमध्ये 83 बाधित आढळून आलेले आहेत.
पाथर्डीत तालुका तिसर्यास्थानी आला आहे. पाथर्डीमध्ये आज दिवसभरात 60 बाधित आढळले आहेत.
नगर शहरात दिवसभरात 21 बाधित आढळून आलेले आहेत. पारनेर तालुक्यात सध्या बाधितांचा.आकजा वाढत असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे.
Post a Comment