श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुन्हा वाढू लागल्यामुळे आढळगाव येथे ग्रामपंचायत व प्रशासनातर्फे दुकानदार व भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी तपासणी मोहीम सुरू केली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे गाव म्हणून आढळगावची ओळख आहे या गावात मागील काही महिन्यापूर्वी कोरोनाने अनेक मॄत्यू झाले. यात काही तरुणांचाही मॄत्यू झाले आहेत.
आता पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला असल्यामुळे आढळगाव ग्रामपंचायत व तलाठी ग्रामसेवक व पोलिस यांच्या संयुक्तपणे दुकानदार व भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी मोहीम राबविली आहे.
यासाठी सरपंच शिवप्रसाद उबाळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम राऊत.ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहुर वाघ, तलाठी महेंद्र काळे, पोलिस कर्मचारी अमोल भैलुमे व वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शेळके आदींनी सहकार्य केले.
आज आढळगाव मध्ये दुकानदार व भाजी विक्रेते यांची कोरोना चाचणी करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली तशीच मोहीम लसीकरण करण्यासाठीही राबवण्यात यावी असे मत संतोष सोनवणे यांनी व्यक्त केले.
Post a Comment