नगर : बंद दुकानाच्या शटरचे कुलूप चोराने तोडून शटर उचकाटून आत प्रवेश केला. आतील एक लाख बारा हजार चारशे रुपये किमतीचा किराणामाल व रोकड असा ऐवज चोरून नेला.
ही घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रोडवरील पूनम सुपर मार्केट येथे घडली. याबाबतची माहिती अशी की सुरेश एडके (वय.41 राहणार एडके कॉलनी, पाथर्डी) यांचे माणिकदौंडी रोडवर पूनम सुपर मार्केट नावाचे दुकान आहे.
या दुकानाचे कुलूप रात्री कोणीतरी अज्ञात चोराने तोडून शटर वाकवून आत प्रवेश केला. आतील एक लाख बारा हजार चारशे रुपये किमतीचा किराणामाल व कॅश काउंटर मधील रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी सुरेश एडके यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीच्या गुन्ह्याचे नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार गोल्हार करीत आहे.
या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील किराणा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरी प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.
Post a Comment