ग्रामस्थांनी प्रशासनातील सर्व घटकांना गेली आठ दिवसांत सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार...


पारनेर : निघोज आणि परिसरात रॅपिड टेस्ट गेली आठ दिवसांपासून सुरू झाल्याने कोरोना रुण्गांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मात्र निघोज व परिसरातील ग्रामस्थांनी पारनेरच्या सर्व विभागातील प्रशासनाला गेली आठ दिवसांपासून चांगल्या प्रकारे सहकार्य करुन १०० टक्के लॉकडाउन म्हणजे सर्व व्यवहार बंद ठेवून चांगले सहकार्य केले आहे.  

रॅपिड टेस्ट करणारे आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी व आरोग्य सेविका तसेच प्रशासनातील महसूल, आरोग्य, शिक्षक पोलिस विभागातील अधिकारी व सर्वांनाच मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. 

याबद्दल निघोज ग्रामपंचात सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने आभार व्यक्त करुन यापुढेही अशा प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

आनंदा लक्ष्मण गाडिलकर, अरुण गंगाराम वराळ, आरोग्य सेविका सुमित्रा शेटे,  शंकर मेहेर,  रोहन सोनवणे, अक्षय तानाजी शेटे, अर्जुन हाके, तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर‌, मुलिका देवी विद्यालयातील शिक्षक वृंद, मळगंगा विद्यालयातील शिक्षक वृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व शिक्षक वृंद, सर्व आशा सेविका, सर्व अंगणवाडी सेविका, मंडलाधिकारी शेकटकर, कामगार तलाठी निंबाळकर, ग्रामसेवक दत्तात्रेय वाळके, निघोज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच कर्मचारी वृंदाने कोव्हिड टेस्टसाठी खाजगी सहकार्य केले.

या सर्वांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्वात मोठे गाव असताना सहा दिवस अथक परिश्रम घेऊन 80 टक्के कोव्हिड रॅपिड टेस्ट करून खूप मोठी जबाबदारी पार पाडली आहे. टेस्टच्या वेळी अनुपस्थित असलेल्या नागरिकांनी टेस्ट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निघोज या ठिकाणी येऊन टेस्ट करून घ्यावी अशी विनंती केली. 

आठ दिवस गाव बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांची नुकसान झालेले आहे. परंतु गाव सुरक्षित ठेवण्यासाठी तो निर्णय घेणे गरजेचे होते. यापुढच्या काळामध्ये गाव बंद ठेवण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करणं गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post