नगर : नगर दौंड रस्त्यावर रस्त्याच्या कडेला हॉटेलच्या समोर लावलेल्या टँकरच्या डिझेल टाकी चोराने बावीस हजार 607 रुपये किमतीचे 235 लिटर डिझेल चोरुन नेले.
ही घटना नगर दौंड रोड वरील श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारात हॉटेल प्रणिता समोर घडली.
याबाबतची माहिती अशी की विजयकुमार गोळे (वय.43 राहणार पाहुणेवाडी तालुका बारामती) नगर दौंड रोडने जात असताना रात्रीच्या वेळी त्यांचा टॅंकर (क्रमांक एम एच बेचाळीस ए क्यू १०११) श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव शिवारात प्रणिता समोर लावून रात्री तेथे मुक्काम केला असता चोराने टँकरच्या मीटर पाईप काढून आतील बावीस हजार 607 रुपये किमतीचे 235 लिटर डिझेल चोरून नेले.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार बडे करीत आहेत.
डिझेल व पेट्रोलचे दरवाढ झालेली आहे. त्यामुळे दुचाकीतून पेट्रोलची चोरी होत आहे. आता चारचाकी वाहनातून डिझेल चोरी केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या चोरीचा तपास लावण्याची मागणी होत आहे.
Post a Comment