कर्जत : माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. या यशामध्ये कर्जत शहरातील नागरिकांचा अभूतपूर्व सहभाग पाहता नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व विभागीय उपसंचालिका संगीता धायगुडे यांनी कर्जतकराचे विशेष अभिनंदन करीत त्याचे प्रमाणपत्र मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना बहाल केले.
कर्जत नगरपंचायतीने २०२०-२१ माझी वसुंधरा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये कर्जत नगरपंचायतीने राज्यात दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले होते.
माझी वसुंधरा स्पर्धेसाठी कर्जतकरानी लोकसहभागातून मोठी चळवळ उभी करत यासाठी सर्वस्व झोकून दिले होते. याचेच फलित म्हणून कर्जत नगरपंचायतीने महाराष्ट्र राज्यात आपले नाव कोरले.
या स्पर्धेत कर्जतकरांचा उस्फूर्त सहभाग पाहता केवळ एकमेव नगरपंचायत आहे की, ज्यामध्ये कर्जतकराच्या लोकसहभागाचे सन्मान नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व विभागीय उपसंचालिका संगीता धायगुडे यांनी विशेष सन्मानपत्र बहाल करत केले.
हे सन्मानपत्र कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी स्वीकारले. यावर्षी कर्जत नगरपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावला असला तरी याच लोकचळवळीने पुन्हा नव्या जोमाने आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे.
आजमितीस देखील भल्या पहाटे आपले काम चोख बजावत आहेत. पुढील वर्षी पहिलाच क्रमांक पटकावायचा हे ध्येय उराशी बाळगले आहे, असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
नाशिक विभागात नव्हे तर राज्यात कर्जत नगरपंचायतीचा लोकसहभाग विशेष वाखाण्याजोगा होता. कर्जतकरानी ध्येय वेडे होत आपले काम माझी वसुंधरा स्पर्धेत चोख बजावले होते. याचेच फलित म्हणून काल नाशिकचे विभागीय आयुक्त आणि उपसंचालिका यांनी एकमेव नगरपंचायत आहे. ज्यात कर्जतकराचे विशेष प्रमाणपत्र देत गौरव केला. निश्चित हे प्रमाणपत्र कर्जतसाठी भाग्यशाली राहणार आहे.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी, नगरपंचायत - कर्जत
Post a Comment