शेवगावमधील टपरीधारकांचे जिल्हा परिषदेत उपोषण...


नगर : जिल्हा परिषदेच्या जागेवर बीओटी तत्वाने शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे या मागणीसाठी टपरीधारकांनी जिल्हा परिषदेत उपोषण केले.

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, शेवगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनिल काकडे, संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदिप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, बबलू तांबोळी, राजू वाकळे, भाऊसाहेब भाग्यवंत, रणजित शेळके, राधेश्याम मुंदडा, ज्ञानदेव सोनवणे, मधुकर वणवे, बबन घुगे, प्रल्हाद कांबळे आदिंसह टपरीधारक सहभागी झाले होते.

शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी सादर केलेल्या 2017 च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या मागणीसाठी स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या व शेवगावच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) जिल्हा परिषदेसमोर प्राणांतिक उपोषण करण्यात आले.  

जिल्हा परिषदेच्या बांधकामचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post