नेप्ती उपबाजारातील कांद्याला मिळाला इतका भाव...


नगर :  नेप्ती उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. कांद्याला 2100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. 

नेप्ती उपबाजारात समितात सोमवारी सुमारे 52 हजार 199 कांदा गोण्यांची आवक झाली आहे. कांद्याला सर्वाधिक प्रति क्विंटल 2100 रुपये भाव मिळाला. 

कांद्याचे शनिवारचे प्रतिवारीनुसार भाव :

एक नंबर कांद्याला 1500 ते  2000  दोन नंबर कांद्याला 1050 ते 1500, तीन नंबर कांद्याला 600 ते 1050, चार नंबर कांद्याला 200 ते 600 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. 

कांद्याचे सोमवारचे प्रतिवारीनुसार भाव :

एक नंबर कांद्याला 1550 ते  2100  दोन नंबर कांद्याला 1000 ते 1550, तीन नंबर कांद्याला 650 ते 1000, चार नंबर कांद्याला 300 ते 650 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला आहे. 

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post