निघोज येथील तीन युवानेत्यांना कमिटीचे अध्यक्षपद व सदस्य पद दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आमदार निलेश लंके यांचा सत्कार


पारनेर : निघोज येथील तीन युवानेत्यांना कमीटीचे अध्यक्षपदी व सदस्यपदी नियुक्ती केल्याबद्दल लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार निलेश लंके यांचा पारनेर येथे सत्कार करण्यात आला. असल्याची माहिती नगर सह्याद्री बरोबर बोलताना मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मंगेश लंके यांनी दिली आहे. 

यावेळी निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड.बाळासाहेब लामखडे, हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी वराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष व विज समीतीचे सदस्य सोमनाथ वरखडे, निघोज व्यापारी असोसिएशन पदाधिकारी व जैन समाज संघटनेचे शहराध्यक्ष प्रदीप गांधी, कपिलेश्वर दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाशेठ लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मंगेश लंके, पोपट लंके, सुकापाटील ढवळे, भरत ढवळे, हौशाभाऊ शेटे, चंद्रकांत लंके, शंकर वरखडे, दिलीप ढवण, ज्ञानेश्वर लामखडे, संतोष रसाळ , पप्पु लंके, प्रपुल लंके, गोविंद लामखडे, विकास शेटे, सोपान लामखडे, दिलीप कवाद, रोहिदास लामखडे, मोहनशेठ सुपेकर, अनिल सुपेकर, विश्वास शेटे,शंकर लामखडे, दिगंबर लाळगे,गणेश कवाद, संदीप वराळ,चेतन थोरात,नितीन थोरात,मंगेश लंके,प्रवीण लंके,अशोक ढवळे, राजू लाळगे, नवनाथ लाळगे, गुणाजी रसाळ, भास्कर लंके, सचिन लंके , शंकर लंके, सत्यकात कवाद, गोरख लामखडे,श्रावन जाधव, बाळू लंके, गुलाब काळे, कैलास कवाद,दत्ता लंके,पाराजी लामखडे, लहु ढवण, योगेश राऊत,बबलु पांढरंकर, स्वप्नील जाधव , विकास लंके,पक्का लंके, गोट्या लंके , सोपान लामखडे , प्रदिप लामखडे , प्रकाश लामखडे , ज्ञानेश्वर शेटे , आकाश लामखडे आदी संख्येने उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब लामखडे म्हणाले आमदार लंके यांनी कमीटीमध्ये युवकांना स्थान देताना तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा जाईल याचा विचार केला आहे. 

जनतेच्या दृष्टीने व पक्षाच्या दृष्टीने आमदार लंके यांचे कार्य मोठे आहे.कोरोना संकटकाळात त्यांनी देवदूतासारखे काम केले. गेली दोन वर्षात विकासकामे करताना मतदार संघातील प्रत्येक गावाला विकासात प्राधान्य कसे मिळेल यासाठी त्यांनी विकासाभिमुख सातत्य ठेवले आहे. 

यावेळी आमदार लंके यांनी कमिटी अध्यक्ष व सदस्य यांनी जनतेत जाऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके यांनी प्रतिष्ठान माध्यमातून गेली पाच वर्षात चांगले काम केले असून कार्यक्षमतेने काम करण्याची गरज ओळखून आपण युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post