पारनेर ः जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता कांदा विक्रीस काढण्यास सुरवात केलेली आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढल्याने त्याचा परिणाम भाववर झालेला आहे.
पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले असून एक नंबर कांद्याला 2000 रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.
पारनेर बाजार समितीत कांद्याच्या सहा हजार 815 कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला 1900 ते 2000, दोन नंबर कांद्याला 1500 ते 1800, तीन नंबर कांद्याला एक हजार ते 1400, चार नंबर कांद्याला 300 ते 900 रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याला 2000 हजारापर्यंत भाव मिळाला असला तरी त्यात आणखी वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
मात्र मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होत नसल्याची चर्चा सध्या व्यापारी वर्गात सुरु आहे. शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून विक्री आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात येत आहे.
Post a Comment