कांदा व डाळिंबाला किती मिळाला भाव...


राहाता : येथील बाजार समितीत शुक्रवारी  कांद्याची 14 हजार  गोण्यांची आवक झाली.  भाव मात्र स्थिर आहेत.

राहाता बाजार समितीत 14 हजार 433 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 1900 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला. 

कांद्याचे भाव प्रति क्विंटलमध्ये एक नंबर कांदा : 1500 ते 1900, दोन नंबर कांदा : 850 ते 1450, तीन नंबर कांदा : 400 ते 800, गोल्टी कांदा : 1200 ते 1400, जोड कांदा : 100 ते 400

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

राहाता बाजार समितीत डाळिंबाची 21 हजार 800 क्रेटसची आवक झाली. यामध्ये डाळिंबाला सर्वाधिक 105 रुपये किलोचा भाव मिळाला.

बाजार समितीचे किलोमध्ये डाळिंबाचे भाव : एक नंबर डाळिंब : 76 ते 105, दोन नंबर डाळिंब : 51 ते 75, तीन नंबर डाळिंब : 26 ते 50, चार नंबर डाळिंब : अडीच रुपये ते 25 रुपये किलो दराने विक्री झाली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post