पाथर्डी : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. रामदास बर्डे यांची फेरनिवड करण्यात आली. डॉ. बर्डे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
नगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत निवड जाहीर करण्यात आली. डॉ. बर्डे हे या पदावर पाच वर्षापासून कार्यरत होते. त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.
पाच वर्ष त्यांनी उल्लेखनीय व अत्यंत समाधानकारक काम करून संघटनेच्या माध्यमातून हजारो उपेक्षित समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन मराठा सेवा संघाच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली.
यावेळी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष के. डी. पाटील, विभागीय अध्यक्ष दिलीप बदाणे, जिल्हा अध्यक्ष सुरेश इथापे, डॉ. संदीप कडलक, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सचिव राजश्री शितोळे, जिल्हा अध्यक्षा संपूर्णा सावंत, रामेश्वर कर्डिले उपस्थित होते.
Post a Comment