पारनेर ः पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज (शुक्रवारी) झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला मागील लिलावाच्या तुलनेत क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ झाली.
पारनेर बाजार समितीत आठ हजार 508 कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. यामध्ये कांद्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र एक नंबर कांद्याला सर्वाधिक 2000 रुपयांचा भाव प्रतिक्विंटलचा मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांद्याला 1900 त 2000, दाेन नंबर कांद्याला 1500 ते 1800, तीन नंबर कांद्याला एक हजार ते 1400, चार नंबर कांद्याला 300 ते 900चा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.
Post a Comment