पारनेर : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे, अशी निवेदन देऊन मागणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत पारनेर राष्ट्रवादी युवतीच्या माया रोकडे उपस्थित होत्या. जगभरामध्ये सुरु असलेल्या महामारीचा होणारा त्रास समाजातील प्रत्येक घटकाला सहन करावा लागतो. समाजातील प्रत्येक जन या कोरोनाच्या महामारीमध्ये होरपळून निघत आहे. त्यातीलच एक घटक म्हणजे दिव्यांग लोक.
या कोरोनाला हरवण्यासाठी राज्यशासन व प्रशासन यांनी सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेचा लाभ या दिव्यांग व्यक्तीला घेण्यात यावा व कोणत्याही दिव्यांग व्यक्तीची लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निवेदन देत आहे कि लसीकरण केंद्रावरती जे दिव्यांग लोक आहेत.
त्यांना रांगेत उभे राहून लस घ्यावी लागते. असे काही लोक आहेत त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही.
या लोकांकडे आपण जिल्हाधिकारी या नात्याने विशेष लक्ष द्यावे ही नम्र विनंती त्याच बरोबर अशा लोकांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यामातून दिव्यांग लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.
त्यासाठी आठवडयातून एक दिवस खास दिव्यांग लसीकरणासाठी देऊन लस उपलब्ध करुन द्यावी अशी नम्र विनंती असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अहमदनगर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी म्हटले आहे.
Post a Comment