पाथर्डी : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांमध्ये सर्वच ठिकाणचा संपर्क कमी झाला होता. आता मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने कार्यकर्त्यांच्या सुख दुःखा मध्ये सहभागी होत आहे. कोरोना निर्बंधाचे तंतोतंत पालन करून आगामी काळात पाथर्डी तालुक्यात संपर्क अभियान सुरु ठेऊ असे प्रतिपादन शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले.
पाथर्डी शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी सदिच्छा व सांत्वन भेटी घेण्यासाठी डॉ.घुले यांनी तालुका दौरा केला. यावेळी माजी नगरसेवक चाँद मनियार व नगरपरिषदेच्या गटनेत्या आसिया मनियार यांच्या निवासस्थानी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक बंडू बोरुडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, युवकचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, विद्यार्थी आघाडीचे अजित चौनापुरे, भाऊ तुपे, रोहित पुंड, अक्रम आतार, शिवम वाघमारे आदी उपस्थित होते.
यादरम्यान नगरसेवक महेश बोरुडे, जमीर शेख, उदयन गर्जे, पप्पू बोर्डे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर तर पप्पूशेठ चौनापुरे यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभापती क्षितिज घुले यांनी पाथर्डी तालुक्यात एंट्री केली आहे.
आगामी काळात देखील पाथर्डी तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे घुले यांनी सांगितले.यामुळे आगामी काळात डॉ. घुले यांच्या भूमिकेकडे निश्चितच राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
Post a Comment