राहुरी : देवळाली प्रवरामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्यावतीने तहसीलदार शेख यांना भेटून निवेदन दिले.
११ जुलै २०२१ रोजी देवळाली प्रवरा हद्दीत तब्बल ७२ मी.मी. पाऊस पडला. देवळाली प्रवरा हद्दीतील शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत. नागरिकांच्या घरात पाणी घुसून घरातील धान्य, खते व इतर संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन आज देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने तहसीलदार शेख यांना दिले.
या प्रसंगी टीमचे सदस्य टीमचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, राहुल महांकाळ आदी
या वेळी तहसीलदार शेख यांनी सांगितले की, देवळाली प्रवरा नगरपालिका आणि मंडलाधिकारी यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन पंचनामे आणि मदती संदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येईल.
Post a Comment