नगर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु रविवारी रात्री जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नेवासा तालुक्यात सर्वाधिक ४९ मिमी पावसाची झाला आहे. त्याखालोखाल राहुरी तालुक्यात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. आज येईल... उद्या येईल म्हणत पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत होता.
पाऊस होत नसल्याने खरिपाची पिके जळूच चालली होती. अनेक ठिकाणी दुपार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली.
त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले. जिल्ह्यातील अनेक भागातील तलाव भरून गेलेले असून या पावसाने ओढेनाले दुथडी भरून वाहत होते.
तालुका निहाय पाऊस मिमीमध्ये असा : नगर २३.५ , पारनेर १६.२ , श्रीगोंदा १२.७ , कर्जत १५.९ , जामखेड ८.७ , शेवगाव २७.५ , पाथर्डी २३.६ , नेवासा ४ ९ , राहुरी ४४.४ , संगमनेर १८.५ , अकोले ११ , कोपरगाव ३७.५ , श्रीरामपूर ३२.८ , राहाता ३०.८
Post a Comment