अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे जनतेनेच लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच आदेश नागवडे यांनी दिली
गेल्या दहा दिवसात 21 रुग्ण आढळून आले आहेत. काहींना लक्षण दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 12 ते 16 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
या बाबत शनिवारी कॉरोना दक्षता समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या वेळी सरपंच आदेश नागवडे, उपसरपंच शिवाजीराजे चोरंमले, महेश नागवडे, पोलिस पाटील सुभाष गोरे, अंगणवाडी सेविका शंताताई गोरे, ग्रामविकास अधिकारी नवनाथ गोरे आरोग्य सेविका भोसले उपस्थित होते.
दवाखाने व मेडिकल दुकान सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत, अशी माहिती सरपंच आदेश नागवडे यांनी दिली.
Post a Comment