नगर : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास मी नेहमीच प्राधान्य देतो. अवघड क्षेत्रातील शाळांबाबत अंतिम निर्णय झालेला नाही .सातपैकी तीन निकषात बसणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात सामावून घेतल्या जातील , अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
शिक्षकनेते डॉ . संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समिती व गुरुकुलच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले.
कोरोनाच्या आघाडीवर शिक्षक डाटा एंट्री सारखी अनेक कामे करत आहेत .पण सेतू प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक वेळ मिळत नाही.
त्यामुळे शिक्षकांना देण्यात येणारी डाटा एन्ट्रीसारखी कामे काढून घ्यावीत, वरिष्ठ वेतनश्रेणीचे पुर्ण जिल्ह्याची सुमारे चारशे पन्नास प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, वैद्यकिय बिले व भविष्य निर्वाह निधीसाठी निधी मंजूर करून सर्व प्रकरणांची पुर्तता करावी इत्यादी प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाली.
निधीबाबत असमर्थता व्यक्त करुन इतर सर्व प्रलंबीत प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्वतंत्रपणे दिली.
यावेळी समिती गुरुकुलच्या शिष्टमंडळात दत्ता जाधव , मधूकर मैड , विजय महामूनी व इतर प्रतिनिधी उपस्थित होते .
शालेय पोषण आहाराच्या दिडसे रुपये रकमेसाठी मुले व पालकांना पाचशे ते एकहजार रुपये खर्च येत असल्याची बाब डॉ . संजय कळमकर यांनी लक्षात आणून दिली. यावर झिरो बॅलन्सने मुलांची खाती उघडा. झिरो बॅलन्सने खाते उघडण्यास नकार देणाऱ्या बँकाची नावे आम्हाला तात्काळ कळवा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.
Post a Comment