अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाला निधीची तरतूद व्हावी तसेच लिंपणगाव आणि चांडगाव या दोन्ही गावांमध्ये नविन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.
या संदर्भात पाचपुते यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा केली.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये उपलब्ध असलेले आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये कमी कर्मचारी संख्या असल्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे राज्य शासनामार्फत श्रीगोंदा येथे नविन उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळालेली आहे.
परंतु उपजिल्हा रुग्णालयास अद्यापर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही. तसेच सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्र संख्या कमी असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव आणि चांडगाव या दोन्ही गावांमध्ये नविन आरोग्य केंद्र उभारण्यात यावी, अशी मागणी पाचपुते यांनी यावेळी केली.
Post a Comment