​ कोरोनाचा आलेख वाढताच...पारनेरने पुन्हा घेतली आघाडी...शेवगाव व पाथर्डीत चिंता...


नगर ः
कोरोनाचा आलेख कधी कमी तर कधी जास्त असा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. रोजच्या बाधितांच्या संख्यात कधी भर तर कधी घट होत आहे. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी बाधितंचा आकड्यात वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात दिवसभरात 458 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 47, खासगी तपासणीत 146 तर अॅंटीजेन चाचणीत 265 बाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत.  

पारनेर तालुक्याने जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घेतलेली आघाडी कायम ठेवलेली आहे. काल बुधवारी एक नंबरला संगमनेर तालुक्याने आघाडी घेतली होती. तिला पुन्हा पारनेर तालुक्याने मागे टाकत आपले एक नंबरचे स्थान अबाधित केलेले आहे. पारनेर तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

पारनेर तालुक्यात दिवसभरात 55 जण बाधित आढळून आलेले आहेत. दुसर्या स्थानी शेवगाव तालुका असून शेवगावमध्ये दिवसभारत 54 बाधित आढळून आलेले आहेत. तिसर्यास्थानी पाथर्डी तालुका असून पाथर्डीत 52 जण बाधित आढळून आलेले आहेत. 

नगर शहरात सध्या 24 बाधित आढळून आलेले आहेत. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post