नगर ः पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता कांदा विक्रीवर भर दिलेला आहे. मागणी कमी व पुरवठा जास्त होत असल्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे.
नेप्ती उपबाजार समितीत 72 हजार 347 कांदा गोण्यांची आज (शुक्रवारी) आवक झालेली आहे. एक नंबर कांद्याला 1900 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. कांद्याला मागील आठवड्यात 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र या आठवड्यात त्यात घसरण झालेली आहे.
शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव
एक नंबर कांदा ः 1500 ते 1900, दोन नंबर कांदा ः 1100 ते 1500, तीन नंबर कांदा ः 600 ते 1100, चार नंबर कांदा ः 300 ते 600.
Post a Comment