मुंबई : कोरोनामुळे आतापर्यत दहावीचा निकाल रखडला होता. हा निकाल कधी व कसा लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. पालकांमध्ये निकालाबाबत जास्त उत्सुकता होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१
मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा
ऑनलाईन निकाल उद्या 16 जुलैला दुपारी एक वाजता जाहीर होईल, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे.
हा निकाल कसा लावण्यात येईल आणि मुल्यमापनासाठी कोणता फॉर्म्यूला
वापरला जाईल याबद्दल लोकांच्या मनात संभ्राम आहे. तर या निकालात 50 गुण
नववीच्या परीक्षेच्या आधारावर, तर 30 गुण सराव परीक्षा आणि 20 गुण अंतर्गत
मुल्यमापनावर आधारीत आहे. या सगळ्यावर आधारीत हा निकाल जाहीर होणार
असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे
आत नेमका हा निकाल किती टक्के लागेल, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली
आहे. या निकालात किती शाळा 100 टक्के पास होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे.
Post a Comment