राहाता ः राहाता बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये 14 हजार 265 कांदा गोण्यांची आवक होऊन कांद्याला 1900 रुपयांचा भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत आज सकाळी कांद्याचे लिलाव झाले. राहाता, वैजापूर, श्रीरामपूर आदी तालुक्यातून राहाता बाजार समितीत कांद्याची 14 हजार 265 कांदा गोण्यांची आवक झाली.
यामध्ये एक नंबर कांद्याला 1500 ते 1900, दोन नंबर कांद्याला ः 850 ते 1450, तीन नंबर कांद्याला 400 ते 800, गोल्टी कांद्याला ः 1200 ते 1400, जोड कांद्याला 100 ते 400 रुपयांचा भाव मिळाला.
शेतकर्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करूनच तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
डाळिंबाची चांगली आवक
राहाता बाजार समितीत डाळिंबाची 16 हजार 924 क्रेटस आवक झाली. यामध्ये एक नंबर डाळिंबाला 76 ते 105, दाेन नंबर डाळिंबाला 51 ते 75, तीन नंबर डाळिंबाला 26 ते 50, चार नंबर डाळिंबाला अडीच रुपये ते 25 रुपये किलो दराने भाव मिळाला.
Post a Comment